प्लॅनेट मराठी आणि ब्ल्यू ड्रॅाप फिल्म्स प्रस्तुत ‘रावसाहेब’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गोदावरी’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निखील महाजन आणि ‘गोष्ट एका पैठणीची’ नंतर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त निर्माता अक्षय बर्दापूरकर घेऊन येत आहेत ‘रावसाहेब’ या चित्रपटात मु्क्ता बर्वे, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी, रश्मी अगडेकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे आणि निखिल महाजन लिखित या चित्रपटाचे अक्षय बर्दापूरकर,संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे निर्माते आहेत.
देशाची सिस्टीम बिघडली की सिस्टीमचं जंगल होतं…
‘रावसाहेब’
लवकरच जवळच्या चित्रपटगृहात